जय महाराष्ट्र न्यूज, बीड बीडमध्ये उर्दू बोर्ड लावल्यामुळे शिवसेना आक्रमक झाल्याचं दिसून आले. काही दिवसांपूर्वी नगरपरिषदवर उर्दू बोर्ड लावण्यात आले होते. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हे बोर्ड फाडून टाकले. काका-नानू विकास आघाडीच्या नगरसेवकांनी नगरपरिषदवर बोर्ड लावले होते. याच विरोधात शिवसेना आक्रमक झाली. त्यामुळे सध्या बीड नगरपरिषद परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली.