Santosh Deshmukh Case : धनंजय देशमुखांच्या तक्रारीची दखल! पोलीस पथकांचा दिवसभर कारागृहात तळ; सीसटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स, डाटा सगळंच खंगाळलं

बीड : बीड जिल्हा कारागृहात असलेल्या आरोपी वाल्मिक कराडसह इतर कैद्यांना नियमाबाह्य सुविधा दिल्या जात असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला होता. याबाबतची तक्रार त्यांनी कारागृह विभागाच्या वरिष्ठांसह मुख्यमंत्र्यांकडे केली होती. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या कारागृहाच्या कारभाराबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. या सर्वांची तातडीने दखल घेण्यात आली असून गुरुवारी दिवसभर पुणे आणि संभाजीनगर येथील पथकाने […]

Santosh Deshmukh Case : धनंजय देशमुखांच्या तक्रारीची दखल! पोलीस पथकांचा दिवसभर कारागृहात तळ; सीसटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स, डाटा सगळंच खंगाळलं

बीड : बीड जिल्हा कारागृहात असलेल्या आरोपी वाल्मिक कराडसह इतर कैद्यांना नियमाबाह्य सुविधा दिल्या जात असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला होता. याबाबतची तक्रार त्यांनी कारागृह विभागाच्या वरिष्ठांसह मुख्यमंत्र्यांकडे केली होती. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या कारागृहाच्या कारभाराबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. या सर्वांची तातडीने दखल घेण्यात आली असून गुरुवारी दिवसभर पुणे आणि संभाजीनगर येथील पथकाने कारागृहातील कागदपत्रांची तपासणी केली. तसेच सीसीटीव्ही फुटेज, फोन कॉल्सचे डिटेल्स, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचे डिटेल्सदेखील तपासले आहेत. यातील महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली असून सकाळी 11 वाजता दाखल झालेली ही दोन्ही पथके सायंकाळी 5 वाजेपर्यंत तपासणी करत होती. याचा सविस्तर अहवाल आता वरिष्ठांना सादर केला जाणार आहे. त्यातूनच आता धनंजय देशमुख यांनी तक्रारीत केलेल्या आरोपांची सत्यता समोर येऊ शकणार आहे.

हेही वाचा : Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणात व्हीआयपी ट्रीटमेंटच्या आरोपांवर बीड कारागृह प्रशासनाचा खुलासा; 'सर्व सुविधा…

बीड जिल्हा कारागृहात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले याच्यासह भुसंपादन घोटाळ्यातील आरोपी माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक, पतसंस्था घोटाळ्यातील आरोपी सुरेश कुटे, अर्चना कुटे, बबन शिंदे, शाहीनाथ परभणे, बियाणी यांच्यासह इतर कैदी असून या सर्वांमुळे कारागृहातील कारभाराबाबत वारंवार प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. गुरुवारी झालेल्या तपासणीतून आता या आरोपांमध्ये तथ्य आहे किंवा नाही, हे समोर येऊ शकणार आहे.

दरम्यान, बीड जिल्हा कारागृहातील कैद्यांना कथित व्हीआयपी सुविधा दिल्या जात असल्याच्या आरोपांनंतर कारागृह प्रशासनाने काल अधिकृत भूमिका स्पष्ट केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना नियमबाह्य सुविधा पुरवल्या जात असल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर राज्यभर या प्रकरणाची चर्चा रंगली होती. मात्र, या सर्व आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून कारागृहातील प्रत्येक सुविधा शासनाच्या नियमांनुसारच दिली जात असल्याचा दावा प्रशासनाने केला. याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील एक्सवर पोस्ट केली होती. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number