Beed FDA Raid: बीडमध्ये खाद्यतेलाचा मोठा पर्दाफाश! FDAच्या धाडीत 1.19 लाख किलो तेल जप्त, 5 उद्योगांचे परवाने निलंबित

बीडमध्ये FDAची मोठी कारवाई करत पाच तेल रिपॅकिंग उद्योगांवर धाड टाकली. संशयित खाद्यतेल जप्त करून पाचही आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

Beed FDA Raid: बीडमध्ये खाद्यतेलाचा मोठा पर्दाफाश! FDAच्या धाडीत 1.19 लाख किलो तेल जप्त, 5 उद्योगांचे परवाने निलंबित

बीडमध्ये खाद्यतेलाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी कारवाई अन्न व औषध प्रशासनाने केली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील FDAच्या पथकाने बीड जिल्ह्यातील पाच तेल रिपॅकिंग उद्योगांवर अचानक धाडी टाकून मोठ्या प्रमाणात संशयित खाद्यतेल जप्त केले. या कारवाईमुळे खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर आणि ग्राहकांच्या आरोग्याच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 6 आणि 7 ऑगस्ट रोजी MIDC बीड, माजलगाव आणि वडवणी परिसरात ही तपासणी करण्यात आली. पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल 1 लाख 19 हजार 187 किलो संशयित खाद्यतेल ताब्यात घेण्यात आले. या तेलाची अंदाजे किंमत 1 कोटी 94 लाख 50 हजार 922 रुपये असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

तपासणीदरम्यान तेलाच्या साठवणुकीपासून ते पॅकिंग आणि विक्रीपर्यंत अनेक त्रुटी आढळल्याचे समोर आले. काही ठिकाणी जुने आणि स्वच्छतेच्या निकषांवर प्रश्न निर्माण करणारे टिन पुन्हा वापरले जात असल्याचे आढळले. तसेच एकाच टाकीत साठवलेले तेल वेगवेगळ्या नावांनी बाजारात आणले जात असल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले. याशिवाय तेल साठवण्याच्या टाक्यांची योग्य देखभाल नसणे, परिसरात स्वच्छतेचा अभाव, आवश्यक तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता आणि नियमित प्रयोगशाळा तपासणी न करणे यांसारख्या बाबी आढळल्या. कर्मचाऱ्यांकडे आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्रे नसल्याचेही तपासणीत समोर आले.

कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या तेलाचे २७ नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या नमुन्यांच्या अहवालानंतर तेलाची गुणवत्ता आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ किंवा नियमबाह्य बाब आहे का, हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, प्रशासनाने संबंधित पाचही आस्थापनांचे परवाने निलंबित करून त्यांचे कामकाज थांबवले आहे. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number