Beed Farmer: आर्थिक विवंचना, आरक्षण आंदोलनातील गुन्ह्यांचा तगादा…; बीडमधील शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, नातेवाईकांचे गंभीर आरोप

बीडच्या वैतागवाडीमधील एका शेतकऱ्याने आपले आयुष्य संपवलं आहे.

Beed Farmer: आर्थिक विवंचना, आरक्षण आंदोलनातील गुन्ह्यांचा तगादा…; बीडमधील शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, नातेवाईकांचे  गंभीर आरोप

बीडमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बीडच्या वैतागवाडीमधील एका शेतकऱ्याने आपले आयुष्य संपवलं आहे. त्यामुळे गावावर एकच शोककळा पसरली आहे. त्याने हे पाऊल आर्थिक विवंचनेतून उचलल्याचे समोर आले आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, बीडच्या वैतागवाडी गावातील अशोक महादेव डिसले या तरुण शेतकऱ्याने नापिकी कर्जबाजारीपणा व मराठा आरक्षण आंदोलनातील गुन्ह्याचा तगादा,कोर्ट कचेरीचा त्रास, गुन्हा दाखल होऊनही कुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 

आरक्षण आंदोलनातील गुन्हे दाखल झाल्यामुळे अनेक तरुणांचे आयुष्य उध्वस्त झाले आहे सरकारने गुन्हे मागे घेतो असे आश्वासन दिले होते मात्र गुन्हे मागे न घेतल्याने व कोर्टकचेरीचा तगादा, त्याच आर्थिक अडचण यामुळे अशोक याने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा नातेवाईकांनी सांगितलं. जोपर्यंत गुन्हे मागे घेण्यासंदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेतले जाणार नाही असा इशारा नातेवाईकांनी दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number