बिंदूसरा नदीवरील पूल अदृष्य; बीडवासीयांनी उगारले आंदोलनाचे हत्यार

जय महाराष्ट्र न्यूज, बीड नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे बीडमधील बिंदुसरा नदीवरील पूल वाहून गेला आहे. हा पूल वाहून गेल्याने बीड शहरात  नागरिकांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे बीडवासीयांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.    धुळे-सोलापूरला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील  ब्रिटीशकालीन पूल कमकुवत झाल्याने 3 महिन्यापूर्वी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे धुळे-सोलापूरला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 211 ला पर्यायी रस्ता […]

बिंदूसरा नदीवरील पूल अदृष्य; बीडवासीयांनी उगारले आंदोलनाचे हत्यार

जय महाराष्ट्र न्यूज, बीड

नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे बीडमधील बिंदुसरा नदीवरील पूल वाहून गेला आहे. हा पूल वाहून गेल्याने बीड शहरात  नागरिकांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे बीडवासीयांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. 

 

धुळे-सोलापूरला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील  ब्रिटीशकालीन पूल कमकुवत झाल्याने 3 महिन्यापूर्वी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे धुळे-सोलापूरला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 211 ला पर्यायी रस्ता म्हणून मोठ्या पुलाच्या शेजारी पर्यायी छोटा पूल जिल्हाप्रशासनाने सुरू केलेला हा छोटा पूल वहून गेला आहे. 

 

या घटनेकडे आधीच लक्ष वेधुनही ग्रामविकास मंत्री आणि स्थानिक आमदारांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप राष्ट्रवादी युवा नेते संदीप क्षीरसागर यांनी केला आहे. पूल नसल्याने प्रवाश्यांना 10 किमीचा वळसा घालून आपला मार्ग काढावा लागत आहे. कमकुवत पुलासंबंधी वेळोवेळी तक्रार करुनही लक्ष न दिल्याने बीडच्या रहिवाश्यांनी आंदोलन पुकारले आहे.

चार जिल्ह्याचा नेहमीच्या रहदारीचा मार्ग अचानक बंद झाल्याने रहिवाश्यांना मोठा फटका बसत आहे. राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक शहरातून वळवली आहे त्यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे बीडकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number