चालकाचे नियंत्रण सुटल्याने दोन बस धडकल्या;चालकाचा मृत्यू, 30हून अधिक जखमी

जय महाराष्ट्र न्यूज, बीड बीडच्या अंबाजोगाईत दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात, बस चालकाचा मृत्यू झालाय. या अपघातात 30 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. अंबाजोगाई येथून जवळच असलेल्या वरवटी गावाजवळ गुरुवारी सकाळी 8च्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. गंगाखेड-पुणे आणि लातूर-परभणी या दोन बस वेगाने समोरासमोर आल्या. दोन्ही बसवर चालकांचं नियंत्रण राहिलं […]

चालकाचे नियंत्रण सुटल्याने दोन बस धडकल्या;चालकाचा मृत्यू, 30हून अधिक जखमी

जय महाराष्ट्र न्यूज, बीड

बीडच्या अंबाजोगाईत दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात, बस चालकाचा मृत्यू झालाय. या अपघातात 30 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. अंबाजोगाई येथून जवळच असलेल्या वरवटी गावाजवळ गुरुवारी सकाळी 8च्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. गंगाखेड-पुणे आणि लातूर-परभणी या दोन बस वेगाने समोरासमोर आल्या.

दोन्ही बसवर चालकांचं नियंत्रण राहिलं नाही, त्यामुळे त्या एकमेकींना धडकल्या. या अपघातात लातूर- परभणी गाडीचे चालक मारूती गोपीनाथराव कातकडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. दरम्यान,  सर्व जखमी प्रवाशांवर अंबाजोगाईतील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number