Beed 10th Exam : परीक्षेच्या पहिल्याच दिवशीच सावळा गोंधळ; मुलांचा पेपर चक्क टेरेसवर मंडप टाकून, शाळा प्रशासनाची मात्र सारवा सारव

प्रतिनिधी, आमीर हुसैन बीडच्या कुर्ला येथील यशवंत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेमध्ये दहावीची परीक्षा सुरू आहे. मात्र आज परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ पाहायला मिळाला. शाळेच्या टेरेसवर मंडप उभारून विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था शाळेने केली. त्यामुळे सर्व सुविधांचा  बोजवारा उडाल्याचं यातून दिसून आलं. अनेक वर्षांपासून शाळेच्या व्हरंड्यात बसून विद्यार्थी पेपर द्यायचे.  मात्र यावर्षी विद्यार्थी […]

Beed 10th Exam : परीक्षेच्या पहिल्याच दिवशीच सावळा गोंधळ; मुलांचा पेपर चक्क टेरेसवर मंडप टाकून, शाळा प्रशासनाची मात्र सारवा सारव

प्रतिनिधी, आमीर हुसैन

बीडच्या कुर्ला येथील यशवंत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेमध्ये दहावीची परीक्षा सुरू आहे. मात्र आज परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ पाहायला मिळाला. शाळेच्या टेरेसवर मंडप उभारून विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था शाळेने केली. त्यामुळे सर्व सुविधांचा  बोजवारा उडाल्याचं यातून दिसून आलं. अनेक वर्षांपासून शाळेच्या व्हरंड्यात बसून विद्यार्थी पेपर द्यायचे.

 मात्र यावर्षी विद्यार्थी संख्या वाढली आणि त्यामुळे हा प्रकार घडल्याचं केंद्रप्रमुखांनी मान्य केलं. उद्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था केल्याचे म्हणत या प्रकारावर शाळा प्रशासनाने सारवा सारव केली. 

हेही वाचा – ‘जो भावाचा नाही झाला, तो गावाचा काय होणार?’, ज्योती वाघमारेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका 

शिवाय सध्या राज्यभरात तापमान वाढत असल्याने उकाड्याचा त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागला. बारावी नंतर दहावी परीक्षा सुरळीत होण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असताना हा सावळा गोंधळ समोर आला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number