महाराष्ट्रात सत्तापालट होऊन अन् शिंदे फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होत असताना बुधवारी भाजपची कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडली आहे. या महत्त्वाच्या बैठकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला टक्कर द्यायची असेल तर अधिक आक्रमक व्हा आपल्याला मिशन ४५ हे लक्ष पूर्ण करायचे त्यासाठी कामगिरी अधिक सुधारा, असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
भाजपाच्या मंत्र्यांच्या एका वर्षाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. भाजपाच्या मंत्र्यांना याबाबत यापूर्वीच पूर्वकल्पना देण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी केलेल्या कामाचा संपूर्ण लेखाजोखा या बैठकीत मांडण्यात आला आहे. अशातच कामगिरी सुमार असलेल्या मंत्र्यांना कामगिरी सुधारण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे समोर आले आहे. तर, मिशन ४५ हे लक्ष पूर्ण करायचे त्यासाठी कामगिरी अधिक सुधारा, असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.