बीडीडी चाळींच्या पुनर्विकासामध्ये अडथळा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   वरळीतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी काढण्यात येणाऱ्या निविदांना विकासकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचं पुढे आलं. पुनर्विकासासाठी बायोमेट्रिक्सचा मुद्दा, कॉर्पस फंड, पुनर्वसन अशा विविध मुद्याचा अडसर निर्माण होत आहे. त्यामुळे या पुनर्विकासासाठी काढण्यात आलेल्या निविदांना पुन्हा मुदतवाढ देण्याची वेळ आली.   राज्य सरकारनं मुंबईतल्या सर्वांत जुन्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखला. त्यातील […]

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासामध्ये अडथळा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

वरळीतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी काढण्यात येणाऱ्या निविदांना विकासकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचं पुढे आलं. पुनर्विकासासाठी बायोमेट्रिक्सचा मुद्दा, कॉर्पस फंड, पुनर्वसन अशा विविध मुद्याचा अडसर निर्माण होत आहे. त्यामुळे या पुनर्विकासासाठी काढण्यात आलेल्या निविदांना पुन्हा मुदतवाढ देण्याची वेळ आली.

 

राज्य सरकारनं मुंबईतल्या सर्वांत जुन्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखला. त्यातील नायगाव आणि ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू झाली. या दोन्ही चाळींसोबत वरळीच्या बीडीडी चाळींचाही पुनर्विकास होणार आहे.

 

त्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून वरळीतील चाळींच्या पुनर्विकासासाठी यंदाच्या एप्रिल महिन्यात निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र, या निविदांना प्रतिसाद मिळात नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number