जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईतील अनेक वर्षांपासून रखडलेल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अखेरीस राज्य सरकारने मार्गी लावला.
आजपासून नायगाव आणि ना.म.जोशी मार्गांवरील बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू झालं आहे.
याकरीता 13 जून 1996 पर्यंतच्या वास्तव्याचा पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे. तसेच सर्वेक्षणाच्या काळात घरात मूळ मालक असणे आवश्यक असल्याची अट घातली
आहे.
मात्र, सध्या मे महिन्याच्या सुट्टीच्या काळात अनेक रहिवासी गावी गेले आहेत. त्यामुळे बीडीडी चाळीतील रहिवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.