लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या राहुल जोहरींबाबत बीसीसीआयने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
आंतराराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या पुढच्या बैठकीला जाण्यास राहुल यांना मनाई करण्यात आली आहे.
बीसीसीआयचे राहुल जोहरी यांच्यावर एका महिलेने ट्विटरवरुन लैंगिक शोषणाचे आरोप केले होते, ही माहिती बीसीसीआय पर्यंत पोहचल्यानंतर बीसीसीआयने त्यांच्याकडून स्पष्टीकरणही मागितले आहे.
बीसीसीआयमध्ये येण्यापूर्वी जोहरी एका मीडिया संस्थेत कार्यरत होते, त्याठिकाणी जोहरी यांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा संबंधित महिलेचा आरोप आहे.