जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
पावणे एमआयडीसीतल्या बावखळेश्वर मंदिर 15 फेब्रुवारीपर्यंत जमीनदोस्त करण्यात येणाराय.
बावखळेश्वर मंदिर ट्रस्टची सर्वोच्च न्यायालयातील फेरविचारा बाबतची याचिका मागे घेण्यात आलीय. गणेश नाईक यांनी बावखळेश्वर मंदिर बचाओ लढाईतून माघार घेतलीय.
सर्वोच्च न्यायालयाने आणि मुंबई उच्च न्यायालयाने बावखळेश्वर मंदिर बेकायदा ठरवले होते. फेरविचारा बाबतची याचिका फेटाळण्याच्या तयारीत असताना बावखळेश्वर मंदिर ट्रस्टने ही याचिका मागे घेतलीय. त्यामुळे 15 फेब्रुवारीपर्यंत बांधकाम काढण्याचे प्रतिज्ञापत्र सादर केलंय.