जय महाराष्ट्र न्यूज, सांगली
सांगलीच्या बत्तीस शिराळ्यात नागपंचमीचा उत्साह आहे. जिवंत नागांच्या प्रदर्शनावर कोर्टानं बंदी घातली.
शिराळ्यात प्रतिकात्मक नागाची मिरवणूक काढली जाणार आहे. डॉल्बीला फाटा देऊन पारंपारिक वाद्यं वाजवली जाणार आहे.
तसंच आदेशाचं उल्लंघन होऊ नये म्हणून प्रशासन सज्ज झालं. पोलिसांची पथकं तैनात करण्यात आलीत. तसंच मुख्य मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत.