‘बारसू आंदोलकांना मरू देणार नाही’

नाणारमध्ये प्रकल्प उभा राहणार होता. मात्र त्याविरोधात स्थानिकांनी आंदोलन केले होते. त्यानंतर हा प्रकल्प बासनात गुंडाळला गेला. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून बारसूची जागा सुचवली होती. ती ओसाड जमीन होती. उद्धव ठाकरेयांनी त्याबाबतचा निर्णय घेतला होता. पण आज जर त्या प्रकल्पालाही बारसूतील स्थानिक जनतेचा विरोध असेल तर आम्ही जनतेच्या सोबत […]

‘बारसू आंदोलकांना मरू देणार नाही’

नाणारमध्ये प्रकल्प उभा राहणार होता. मात्र त्याविरोधात स्थानिकांनी आंदोलन केले होते. त्यानंतर हा प्रकल्प बासनात गुंडाळला गेला. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून बारसूची जागा सुचवली होती. ती ओसाड जमीन होती. उद्धव ठाकरेयांनी त्याबाबतचा निर्णय घेतला होता. पण आज जर त्या प्रकल्पालाही बारसूतील स्थानिक जनतेचा विरोध असेल तर आम्ही जनतेच्या सोबत आहोत. लोक या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी छातीवर गोळ्या झेलण्यास तयार असतील तर पहिली गोळी शिवसेना छातीवर झेलेल, असा इशारा देत हवा बहोत तेज चल रही है, टोपी उड जायेगी, त्यामुळे आम्हाला शहाणपणा शिकवू नये,अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर केली.

संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, प्रकल्पाला लोकांचा विरोध असेल तर शिवसेना त्याला पाठिंबा देणार नाही. तत्कालीन उद्धव ठाकरेंनी त्यावेळी नाणार ऐवजी पर्यायी जागा म्हणून बारसूची जागा सूचवली. तेव्हा कुठलीही हालचाल झाली नव्हती. लोक आता पुढे आली असतील तर आमच्या दृष्टीने आता त्या पत्राची शून्य किंमत आहे. तो शासकीय कागद आहे. उद्धव ठाकरे यांचीही तीच भूमिका आहे. कोणता तरी सरकारी कागद फडकवत उदय सामंत यांनी शहाणपणा करू नये. नाणारला जावे आणि लोकांशी बोलावे, असे संजय राऊत म्हणाले.

बारसूबाबत शिवसेनेने अजिबात दुटप्पी भूमिका घेतलेली नाही. नाणारला पर्याय देण्यासंदर्भात एक भूमिका नक्की घेतली. प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाऊ नये ही आमची भूमिका आहे. आम्ही महाराष्ट्रात येणाऱ्या उद्योगाचे शत्रू नाही. महाराष्ट्रातील लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, अशी बाळासाहेबांची भूमिका होती. उद्योग आला तर रोजगार वाढेल ही भूमिका कायम आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number