दसऱ्याच्या दिवशी भर चौकात हवेत गोळीबार; बारामतीमधील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा प्रताप

जय महाराष्ट्र न्यूज, बारामती   बारामतीमध्ये दसऱ्याच्या दिवशी भर चौकात सिमोल्लंघनाच्या नावाखाली रिव्हॉल्वरमधून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महत्त्वाचं म्हणजे हा गोळीबार राष्ट्रवादीचे नगरसेवक सातव यांनीच केला. गोळीबार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेला आता आठवडा उलटून गेलाय. मात्र, आता सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. पोलीस मात्र आठवड्यानंतरही या घटनेबाबत कुठलीच माहिती […]

दसऱ्याच्या दिवशी भर चौकात हवेत गोळीबार; बारामतीमधील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा प्रताप

जय महाराष्ट्र न्यूज, बारामती

 

बारामतीमध्ये दसऱ्याच्या दिवशी भर चौकात सिमोल्लंघनाच्या नावाखाली रिव्हॉल्वरमधून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

महत्त्वाचं म्हणजे हा गोळीबार राष्ट्रवादीचे नगरसेवक सातव यांनीच केला. गोळीबार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेला आता आठवडा उलटून गेलाय.

मात्र, आता सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. पोलीस मात्र आठवड्यानंतरही या घटनेबाबत कुठलीच माहिती नसल्याचं सांगत आहेत. नगरसेवक सुरज सातव यांच्याकडच्या परवाना असलेल्या रिव्हॉल्वरमधून या गोळ्या हवेत झाडण्यात आल्या होत्या. उपस्थितांमध्ये रूबाब दाखवण्यासाठी हा सगळा प्रकार केला गेला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number