Baramati Crime: बारामती हादरली! पतीला गुंगीचं औषध देऊन केली बॅटने मारहाण; नंतर घरातील कट्ट्यात पुरण्याचा प्रयत्न

पतीला गुंगीचे औषध देऊन अर्धबेशुद्ध केल्यानंतर त्याच्यावर क्रिकेट बॅटने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे.

Baramati Crime: बारामती हादरली! पतीला गुंगीचं औषध देऊन केली बॅटने मारहाण; नंतर घरातील कट्ट्यात पुरण्याचा प्रयत्न

बारामती शहरात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली असून, पतीला गुंगीचे औषध देऊन अर्धबेशुद्ध केल्यानंतर त्याच्यावर क्रिकेट बॅटने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. एवढ्यावरच न थांबता, जखमी पतीला घरातील एका विशिष्ट कट्ट्यात पुरण्याचाही कथित प्रयत्न झाल्याची तक्रार बारामती शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

तक्रारीनुसार, पत्नीने नियोजनबद्ध पद्धतीने पतीला गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तो अर्धबेशुद्ध अवस्थेत असताना त्याच्यावर बॅटने हल्ला करण्यात आला. या घटनेत पती गंभीर जखमी झाला असून, त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला आहे.  या प्रकरणी आरोपी पत्नीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 109(1) अंतर्गत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिला 10 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, या कालावधीत घटनेमागील नेमके कारण, नियोजन आणि इतर बाबींचा तपास केला जाणार आहे.

फिर्यादी प्रकाश कान्होबा जगताप (७१), रा. ढाकाळे, ता. बारामती यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांची सून शर्मिला प्रविण जगताप (३८), रा. इंद्रप्रस्थ सोसायटी, फ्लॅट क्रमांक ९, जामदार रोड, बारामती हिला आरोपी करण्यात आले आहे.. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित प्रविण प्रकाश जगताप (४१) हे भरत फोर्जमध्ये कार्यरत असून त्यांचे आणि पत्नीचे सुमारे दहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना १० वर्षांचा मुलगा आणि ८ वर्षांची मुलगी आहे. गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे..

सध्या बारामती शहर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून, प्राथमिक चौकशीनंतर आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमागील कौटुंबिक वाद किंवा अन्य कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिस विविध पुरावे आणि संबंधित व्यक्तींची चौकशी करत आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number