राज ठाकरे यांच्या विरोधात बॅनरबाजी

ठाण्यात मनसेच्या पार परडेल्या उत्तर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मविआवर निशाणा साधला. तर ईदीपूर्वी मशिदीवरील भोंग उतरवा अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालीसा लावणार असल्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. दरम्यान, राज ठाकरेंनी मविआमधील अनेक नेत्यांवर हल्लाबोल केला. त्यामुळे राज ठाकरे यांच्या विरोधात मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. दादरच्या शिवसेना भवनासमोर राज […]

राज ठाकरे यांच्या विरोधात बॅनरबाजी

ठाण्यात मनसेच्या पार परडेल्या उत्तर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मविआवर निशाणा साधला. तर ईदीपूर्वी मशिदीवरील भोंग उतरवा अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालीसा लावणार असल्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. दरम्यान, राज ठाकरेंनी मविआमधील अनेक नेत्यांवर हल्लाबोल केला. त्यामुळे राज ठाकरे यांच्या विरोधात मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे.

दादरच्या शिवसेना भवनासमोर राज ठाकरे यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली. या बॅनरवर तीन फोटोंची जागा आहे. मात्र, यातील एक जागा रिकीमी असून तेथे प्रश्नचिन्ह देण्यात आले आहे. तर, राज ठाकरे यांची पुढी भूमिका काय असेल? असा प्रश्न या रिकामी जागेला पहून उपस्थित करण्यात येत आहे.

या बॅनरमध्ये पहिल्या रकान्यात राज ठाकरे यांच्या डोक्यावर मुस्लीम टोपी दिसत असून ‘काल’ असे लिहिण्यात आले आहे. तर दुसऱ्य रकान्यात ‘आज’ असे लिहिण्यात आले असून नारंगी रंगात हनुमान लिहीण्यात आले आहे. तर, तिसऱ्या रकान्यात प्रश्नचिन्ह दिसत असून ‘उद्या’ असं लिहिलं आहे. मात्र, राज ठाकरेंच्या विरोधात बॅनर कोणी लावले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तर हे बॅनर आता पोलिसांकडून हटवण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number