पुण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात बॅनरबाजी पाहायला मिळाली. पुण्यातील कोथरूड भागात काही अज्ञातांनी स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांचे बॅनर लावले. या बॅनरमध्ये चंद्रकांत पाटील यांचा फोटो लावून ते हरवले असल्याची माहिती लिहिण्यात आली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची खोडी कोण काढतोय? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.
पुण्यातील कोथरूड भागात चंद्रकांत पाटील यांचे बॅनर झळकत आहे. या बॅनरमध्ये ‘दादा परत या’ असे लिहिण्यात आले असून चंद्रकांत पाटील यांचा फोटो झळकत आहे. तर एका बॅनरवर चंद्रकांत पाटील यांचा फोटो लावून हे हरवले असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्याविरोधातील ही बॅनरबाजी कोणी आणि कशासाठी करण्यात आली याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातून चंद्रकांत पाटील निवडून आले होते. दरम्यान, आता पुण्याच्या कोथरूड भागात काही अज्ञातांनी चंद्रकांत पाटील गेल्या काही दिवसांपासून हरवले आहेत. अशा आशयाचे बॅनर झळकत आहेत. मात्र, अद्याप हे बॅनर कोणी लावले याबाबत चर्चा सुरू झाली आहे.