बॅंक अधिकाऱ्याची राहत्या घरातच गोळ्या घालून हत्या

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद    औरंगाबादमध्ये बॅंक अधिकाऱ्याची राहत्या घरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. मृत इसम हा  सातारा परिसरातल्या छत्रपतीनगरमध्ये ‘औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेत’ व्यवस्थापक पदावर कार्यरत होता. जितेंद्र नारायण होळकर असं या अधिकाऱ्याचं नाव असून रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या घालून हत्या केली.   पहाटेच्या सुमारास जितेंद्र होळकर यांना त्यांच्या कुटुंबीयांनी रक्ताच्या […]

बॅंक अधिकाऱ्याची राहत्या घरातच गोळ्या घालून हत्या

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद 

 

औरंगाबादमध्ये बॅंक अधिकाऱ्याची राहत्या घरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

मृत इसम हा  सातारा परिसरातल्या छत्रपतीनगरमध्ये ‘औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेत’ व्यवस्थापक पदावर कार्यरत होता.

जितेंद्र नारायण होळकर असं या अधिकाऱ्याचं नाव असून रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या घालून हत्या केली.

 

पहाटेच्या सुमारास जितेंद्र होळकर यांना त्यांच्या कुटुंबीयांनी रक्ताच्या थारोळ्यात पाहिले.

त्यानंतर कुटुंबीयांनी पोलीसांत तक्रार दाखल केली.

घडलेल्या प्रकाराचा पोलीस कसून तपास करत आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number