जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
सार्वजनिक बांधकाम विभागाने वांद्रे पूर्व येथील सरकारी वसाहत धोकादायक घोषित करत सुमारे 400 कर्मचाऱ्यांना त्वरीत घरे रिकामी करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. यावेळी, कोणतीही दुर्घटना घडल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार नसेल, असंही नोटीसमध्ये नमूद करण्यात आलंय.
सरकारच्या या भूमिकेमुळे कर्मचाऱ्यांचं कुटुंब हवालदिल झालंय. सरकारने हाती थेट नोटीसा दिल्यामुळे आता कुठे जायचं?, असा प्रश्न अनेक कुटुंबासमोर उभा राहिलायं.
सरकारने या कुटुंबाची कोणतीही पर्यायी व्यवस्थाही केली नसल्याचंही यावेळी समोर आलं. त्यामुळे सरकारनं धाडलेल्या नोटीसा हाती पडल्यावर जायचं कुठं, असा प्रश्न वसाहतीतील कुटुंबांना भेडसावत आहे.