जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे.
अतिक्रमविरोधी कारवाई सुरु असताना ही आग लागली.
अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना सिलेंडर ब्लास्ट झाल्याने लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ब्रांद्रे रेल्वे स्थानकातील तिकीट काऊंटरला देखील आग लागल्याची माहिती मिळत आहे.
अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून जवानांचे आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.