उदयनिधी स्टॅलिनला महाराष्ट्रात प्रवेशबंदी घाला, मंगलप्रभात लोढांची मागणी

मुंबई, ४ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिनने सनातन धर्माची तुलना मच्छर, डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनासोबत करून कोट्यावधी हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान केला आहे. उदयनिधी स्टॅलिन जोवर त्याचे विधान मागे घेत नाही तोपर्यंत त्याला महाराष्ट्रात येण्यास बंदी घालावी अशी मागणी मुंबई उपनगरचे पालकमंत्री, कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री ॲड. […]

उदयनिधी स्टॅलिनला महाराष्ट्रात प्रवेशबंदी घाला, मंगलप्रभात लोढांची मागणी

मुंबई, ४ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिनने सनातन धर्माची तुलना मच्छर, डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनासोबत करून कोट्यावधी हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान केला आहे. उदयनिधी स्टॅलिन जोवर त्याचे विधान मागे घेत नाही तोपर्यंत त्याला महाराष्ट्रात येण्यास बंदी घालावी अशी मागणी मुंबई उपनगरचे पालकमंत्री, कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

धर्म विरोधी लोकांना सनातन हिंदु धर्म कधीच समजू शकला नाही आणि भविष्यातही समजू शकणार नाही! कारण, सनातन संस्कृती ही कोणत्याही प्रकारे प्रभावी औषधासारखी आहे, जी राष्ट्र विरोधी विचारधारेला भारतात वाढू देत नाही! काही समाजकंटकाकडून हिंदू धर्माला बदनाम केले जात आहे. सनातन धर्म नवीन गोष्ट आत्मसात करण्याची, काळानुसार बदलण्याची आणि सत्याच्या शोधासाठी प्रत्येकाला स्वतःच्या मार्गावर चालण्याची मुभा देणारा भाव प्रतिबिंबित करणारा धर्म आहे. उदयनिधी स्टॅलिनचा दुष्ट हेतू त्याच्या वक्तव्यातून समोर आला आहे. अशा प्रकारचे लोक महाराष्ट्रातले वातावरण बिघडवू शकतात. संघटित होऊन या लोकांना कठोर विरोध केला पाहिजे. जोपर्यंत उदयनिधी स्टॅलिन आपले विधान मागे घेऊन माफी मागत नाही तोपर्यंत त्याला महाराष्ट्रात येण्यास बंदी घालावी अशी मागणी कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number