दुकाने उघडण्यास बंदी ;व्यापाऱ्यांचा संताप

कोल्हापूर : गेल्या आठवड्यात व्यापाऱ्यांना दिलेली सवलत या आठवड्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने रद्द केली आहे.त्यामुळे अत्यावश्यक सेवेखेरीज इतर दुकाने उघडण्यास कोल्हापुरात बंदी आहे.मात्र तरीही व्यापारी दुकाने उघडण्यावर ठाम असून प्रशासन आणि व्यापारी यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे.शहराचा रुग्णदर कमी असल्याने व्यापाऱ्यांनी शहरातील दुकाने उघडण्याची परवानगी मागितली आहे.गेल्या आठवड्यात ही परवानगी देण्यात आली.मात्र या आठवड्यात जिल्ह्याचा […]

दुकाने उघडण्यास बंदी ;व्यापाऱ्यांचा संताप

कोल्हापूर : गेल्या आठवड्यात व्यापाऱ्यांना दिलेली सवलत या आठवड्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने रद्द केली आहे.त्यामुळे अत्यावश्यक सेवेखेरीज इतर दुकाने उघडण्यास कोल्हापुरात बंदी आहे.मात्र तरीही व्यापारी दुकाने उघडण्यावर ठाम असून प्रशासन आणि व्यापारी यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे.शहराचा रुग्णदर कमी असल्याने व्यापाऱ्यांनी शहरातील दुकाने उघडण्याची परवानगी मागितली आहे.गेल्या आठवड्यात ही परवानगी देण्यात आली.मात्र या आठवड्यात जिल्ह्याचा रुग्णदर पाहून पुन्हा निर्बंध घालण्यात आल्याने व्यापारी नाराज आहेत.दुकाने उघडण्यावर ठाम असलेल्या व्यापाऱ्यांची आता प्रशासन समजूत काढणार की अलिखित आदेशाने दुकाने उघडण्यास परवानगी देणार हेच पाहणे महत्वाचे आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number