महाराष्ट्रात आता हुक्का पार्लर्स बंद…

रविवारी गृह विभागाकडून अध्यादेश काढून राज्यात हुक्का पार्लरवर बंदी आणण्यात आली आहे. हुक्का पार्लरवर बंदी घातल्यामुळे अनेक तरुण व्यसनापासून दूर राहतील, असा विश्वास गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. ‘कमला मिल’मधील आगीच्या घटनेनंतर हुक्का पार्लरवर बंदी घालण्याची मागणी झाली होती, कारण डिसेंबर 2017 मध्ये कमला मिलमधील ‘मोजोस बिस्रो’ व ‘वन अबोव्ह’ला रेस्टो पबला […]

महाराष्ट्रात आता हुक्का पार्लर्स बंद…

रविवारी गृह विभागाकडून अध्यादेश काढून राज्यात हुक्का पार्लरवर बंदी आणण्यात आली आहे. हुक्का पार्लरवर बंदी घातल्यामुळे अनेक तरुण व्यसनापासून दूर राहतील, असा विश्वास गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे.

‘कमला मिल’मधील आगीच्या घटनेनंतर हुक्का पार्लरवर बंदी घालण्याची मागणी झाली होती, कारण डिसेंबर 2017 मध्ये कमला मिलमधील ‘मोजोस बिस्रो’ व ‘वन अबोव्ह’ला रेस्टो पबला आग लागून त्यात चौदा जणांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान हुक्का पार्लरमधील हुक्क्याच्या कोळशाच्या ठिणग्यांनी आग लागल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. त्यानंतर हुक्का पार्लरवर बंदी घालण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. हुक्का पार्लरवर बंदी घालण्याबाबत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भातील विधेयक मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आले होते. त्यावर गुरुवारी राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे. त्यानंतर गृह विभागाने अध्यादेश काढत महाराष्ट्रात ही बंदी लागू केली आहे. त्यामुळे मुंबईतील 450 हुन अधिक हुक्कापार्लरला कायमचे टाळे ठोकले जाणार आहे.

विशेष म्हणजे गुजरातनंतर महाराष्ट्र अशी बंदी करणारे दुसरं राज्य ठरले आहे. दरम्यान हुक्काबंदीमुळे तरुण व्यसनापासून दूर राहतील असा विश्वास गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number