जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठीच्या भूखंड हस्तांतरण प्रक्रियेला विलंब लागण्याची चिन्ह आहेत.
कारण केरळी महिला समाजाच्या संस्थेनं भूखंड देण्यास नकार दिला आहे. महापौर बंगल्या शेजारी असलेल्या या भूखंडाला केरळी समाजानं विरोध केला असून न्यायालयानं याची दखल
घेतली आहे.
हा भूखंड जैसे थे ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे भूखंड हस्तांतरण प्रक्रियेला उशीर लागण्याची शक्यता आहे.