जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारित ठाकरे चित्रपटाचा टिझर अखेर लाँच करण्यात आलाय. या टिझर लाँच सोहळ्याला अमिताभ बच्चन, शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकेर आणि खासदार संजय राऊत उपस्थित होते.
23 जानेवारी 2019 ला हा सिनेमा रिलीज होईल. ठाकरे या सिनेमात अभिनेता नवाजूद्दीन सिद्दीकी बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारणार आहे.
विशेष म्हणजे या चित्रपटाचं दिग्दर्शन मनसेचे नेते अभिजीत पानसे करणार आहेत. सिनेमाचं शुटींग 80 दिवसांत पुर्ण करण्याचं नियोजन आहे .