वृत्तसंंस्था, नवी दिल्ली
एशियन गेम्स 2018 स्पर्धेमध्ये भारताला पहिल्या सुवर्ण. कुस्तीपटू बजरंग पुनिया याने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. हे सुवर्णपदक माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित करत असल्याची प्रतिक्रिया त्यांने ट्विटरवरुन केलं आहे.
#AsianGames का गोल्ड मैडल ?मैं स्वर्गीय श्री अटल बिहारी वाजपेयी को समर्पित करता हूँ । नमन ? pic.twitter.com/E28fQcKx2g — Bajrang Punia (@BajrangPunia) August 19, 2018
तर बजरंगने जपानच्या तकातानीला 10-8 ने धोबीपछाड देत सुवर्णपदक पटकावले आहे. बजरंग पुनिया आणि आणि जपानच्या तकातानीमध्ये रोमहर्षक सामना रंगला होता, पण बजरंग पुनियाने जबरदस्ती खेळी केली. बजरंगने दोन अंकाची कमाई करत सुवर्णपदक पटकावले आहे.
१० मीटर एअर रायफल पुरूष गटात भारताच्या दीपक कुमारला रौप्य पदक मिळाले आहे. चीनच्या यांग हरोनने बाजी मारल्याने दीपक कुमारला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.
कालपासून जकार्तामध्ये सुरू झालेल्या १८ व्या आशियाई स्पर्धेला सुरूवात झाली. यात भारताने पहिल्याच दिवशी दमदार कामगिरी केली आहे.
पहिल्या दिवशी भारताची पदक कमाई –
एशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात…