पुन्हा घुमणार हुर्रर्रर्रर्रर्रर्रर्रचा नाद…

जय महाराष्ट्र न्यूज, मुबंई राज्यात पुन्हा एकदा सर्जा राजाचा आवाज घुमणार आहे. पुन्हा एकदा ग्रामीण भागात उत्साहाचं वातावरण तयार झालं. बाजार पुन्हा गरम होणार आहे. कारण शंकरपटाला म्हणजे बैलगाडा शर्यतीला आता कायदेशीर मान्यता मिळाली.   महाराष्ट्र सरकारनं मंजूर केलेल्या बैलगाडा शर्यतीच्या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली. राज्य सरकारचा पशुसंवर्धन विभाग आता त्यावर अधिसूचना काढून नियम आणि […]

पुन्हा घुमणार हुर्रर्रर्रर्रर्रर्रर्रचा नाद…

जय महाराष्ट्र न्यूज, मुबंई

राज्यात पुन्हा एकदा सर्जा राजाचा आवाज घुमणार आहे. पुन्हा एकदा ग्रामीण भागात उत्साहाचं वातावरण तयार झालं. बाजार पुन्हा गरम होणार आहे. कारण शंकरपटाला म्हणजे बैलगाडा शर्यतीला आता कायदेशीर मान्यता मिळाली.

 

महाराष्ट्र सरकारनं मंजूर केलेल्या बैलगाडा शर्यतीच्या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली. राज्य सरकारचा पशुसंवर्धन विभाग आता त्यावर अधिसूचना काढून नियम आणि अटी प्रसिद्ध करेल. त्यानंतर मग जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनं बैलगाडा शर्यती घेता येतील.

 

त्यासोबतच प्राण्यांना यातना होणार नाही. प्राण्यांची काळजी घेण्यासदंर्भातल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशा अटी यात घालण्यात आल्या.

 

ग्रामीण भागातली मोठी अर्थव्यवस्था बैलगाडा शर्यतींवर अवलंबून आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावऱण निर्माण झालं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number