आशिष शेलारांना जामीन मंजूर

मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे भाजप नेते ऍड. आशिष शेलार अडचणीत सापडले आहेत. आशिष शेलारांनी केलेल्या विधानामुळे महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती. त्यामुळे महापौरांच्या फिर्यादीनंतर ऍड. आशिष शेलार यांच्याविरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आशिष शेलार यांना जामीन मंजूर झाला […]

आशिष शेलारांना जामीन मंजूर

मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे भाजप नेते ऍड. आशिष शेलार अडचणीत सापडले आहेत. आशिष शेलारांनी केलेल्या विधानामुळे महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती. त्यामुळे महापौरांच्या फिर्यादीनंतर ऍड. आशिष शेलार यांच्याविरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आशिष शेलार यांना जामीन मंजूर झाला आहे.

राजकीय आकसापोटी मुंबई महापौरांनी खोटी तक्रार केली असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच मी कोणताही गुन्हा केलेला नाही असे ते म्हणाले. माझा संघर्ष सुरूच राहणार असन सत्तेचा दुरुपयोग करून मुंबई महापौरांनी खोटी तक्रार केली असल्याचा आरोप भाजप नेते ऍड. आशिष शेलार यांनी केला आहे.

३० नोव्हेंबर रोजी वरळीमध्ये गॅस सिलिंडरच्या स्फोट झालेल्या घटनेत ४ महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाला असून त्याच्या आई-वडिलांचाही या दुर्घेटनेत निधन झाले. त्यामुळे याप्रकरणी ४ डिसेंबर रोजी आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत मुंबई महापौरांवर टीका केली. सिलिंडर स्फोटात ७२ तासानंतर मुंबईचे महापौर पोहोचतात. एवढे तास कुठे निजला होतात, अशी टीका शेलारांनी केली. यावर महापौरांनी आक्षेप घेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहित तक्रार केली. त्यामुळे महापौरांच्या फिर्यादीनंतर ऍड. आशिष शेलार यांच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number