जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
कटप्पानं बाहूबलीला का मारलं? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी गेलेल्या एका कुटूंबाला याची चांगलीच किंमत मोजावी लागली.
नाशिकमधील ससाने कुटूंबीय बाहूबली हा सिनेमा पाहण्यासाठी थिएटरला गेले असता त्यांचं घर चोरट्यांनी साफ केले.
रात्री उशीराचा शो पाहण्यासाठी गेलेल्या ससाने कुटूंबीयांच्या घरातून चोरट्यांनी तब्बल 12 तोळे सोनं आणि 46 ग्राम चांदी चोरून नेली. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये चोरीचं प्रमाण वाढल आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या निमित्ताने किंवा बाहेर फिरायला गेलेल्या अनेकांच्या घरावर चोर पाळत ठेवून लुट करत
असल्याचे निदर्शनास येत आहे.