Badrinath Kedarnath Temple : धार्मिक परंपरा जपण्यासाठी मंदिर प्रशासनाचा महत्वाचा निर्णय; बद्रीनाथ आणि केदारनाथ धाममध्ये फक्त ‘हिंदूंनाच’ प्रवेश

मंदिर समितीच्या माहितीनुसार, चारधाम यात्रेतील बद्रीनाथ आणि केदारनाथ या दोन प्रमुख तीर्थस्थळांमध्ये फक्त हिंदू भाविकांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

Badrinath Kedarnath Temple : धार्मिक परंपरा जपण्यासाठी मंदिर प्रशासनाचा महत्वाचा निर्णय; बद्रीनाथ आणि केदारनाथ धाममध्ये फक्त ‘हिंदूंनाच’ प्रवेश

डेहराडून: उत्तराखंडमधील बद्रीनाथ-केदारनाथ धाम आणि मंदिर समितीच्या अखत्यारीतील इतर मंदिरांमध्ये हिंदू धर्म सोडून इतर धर्मातील नागरिकांना प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने सोमवारी केली. या निर्णयानुसार, आता केवळ हिंदू भाविकांनाच बद्रीनाथ आणि केदारनाथ या प्राचीन मंदिरांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

मंदिर समितीच्या माहितीनुसार, चारधाम यात्रेतील बद्रीनाथ आणि केदारनाथ या दोन प्रमुख तीर्थस्थळांमध्ये फक्त हिंदू भाविकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. इतर धर्मातील नागरिकांचा प्रवेश बंद करण्याचा प्रस्ताव आगामी बोर्ड बैठकीत औपचारिकरित्या मंजूर केला जाणार आहे. हा निर्णय समितीच्या अखत्यारीतील सर्व मंदिरांना लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या घडामोडीला दुजोरा देताना समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी सांगितले की, मंदिर समितीच्या नियंत्रणाखालील सर्व मंदिरांमध्ये इतर धर्मातील नागरिकांचा प्रवेश प्रतिबंधित केला जाईल. मंदिरांची धार्मिक परंपरा, श्रद्धा आणि नियम यांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा: Latur ZP Election: हळदी-कुंकवाला गेलेल्या काँग्रेसच्या महिला उमेदवार पतीसह अचानक गायब; लातूर जिल्हा परिषद निवडणुकीत खळबळ

दरम्यान, उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे 23 एप्रिल रोजी भाविकांसाठी पुन्हा खुले होणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. हिवाळ्यातील सुमारे सहा महिन्यांच्या बंदीनंतर मंदिर पुन्हा दर्शनासाठी खुले केले जाते. वसंत पंचमीच्या निमित्ताने नरेंद्रनगर (टिहरी) येथील टिहरी राजवाड्यात पारंपरिक पूजा-विधीनंतर मंदिर उघडण्याची शुभ तारीख आणि वेळ निश्चित करण्यात आली, असे द्विवेदी यांनी सांगितले.

चारधाम यात्रेतील इतर दोन तीर्थस्थळे गंगोत्री आणि यमुनोत्री यांच्या मंदिरांचे दरवाजे अक्षय तृतीयेला 19 एप्रिल रोजी उघडले जाणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविक चारधाम यात्रेसाठी उत्तराखंडमध्ये दाखल होण्याची अपेक्षा असून, प्रशासनाकडून यात्रेच्या तयारीला वेग देण्यात आला आहे.

हेही वाचा: Jyoti Waghmare vs Ganesh Naik : नाईकांची शिंदेंवरील टीका जिव्हारी, ज्योती वाघमारेंनी थेट औकात काढली

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number