Badnra Slum Area Demolition : वांद्रे टर्मिनसचा चेहरामोहरा बदलणार! रिकाम्या जागेवर विकसित होणार ‘इंटिग्रेटेड रेल्वे कॉम्प्लेक्स’, पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना होणार मोठा फायदा

या दोन्ही स्थानकांना जोडून त्या ठिकाणी भव्य 'इंटिग्रेटेड रेल्वे कॉम्प्लेक्स' विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा पश्चिम रेल्वे प्रशासनाने गुरुवारी केली.

Badnra Slum Area Demolition : वांद्रे टर्मिनसचा चेहरामोहरा बदलणार!  रिकाम्या जागेवर विकसित होणार  ‘इंटिग्रेटेड रेल्वे कॉम्प्लेक्स’, पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना होणार मोठा फायदा

वांद्रे पूर्वेकडील गरीब नगर परिसरात पश्चिम रेल्वेची अतिक्रमणविरोधी मोहीम वेगाने सुरू आहे. गुरुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 90 टक्के बांधकामे हटवण्यात आली होती. वांद्रे टर्मिनलजवळील एक मंदिर आणि देवस्थानासह दोन ते तीन धार्मिक वास्तूही पाडण्यात आल्या. मात्र, बुधवारसारखा गोंधळ झाला नाही.पुरेसे पोलीस दल तैनात करण्यात आले होते. शिवाय, सायंकाळी काही लोकांनी वांद्रे स्थानकाजवळील दुसऱ्या एका प्राधिकरणाच्या ठिकाणी जाऊन पोस्टर्स फाडले, त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. 

बुधवारप्रमाणेच गुरुवारीही सुमारे 1200 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. यामध्ये 250 आरपीएफ जवान, 200जीआरपी जवान, 500 मुंबई पोलीस जवान आणि रेल्वेच्या विविध विभागांतील 250 कर्मचाऱ्यांचा समावेश होता.दरम्याने आता,  अनधिकृत ठरवलेल्या बांधकामावर बुलडोजर चालवल्यानंतर आता या रिकाम्या जागेवर वांद्रे रेल्वे स्थानक आणि वांद्रे टर्मिनसचा चेहरामोहरा बदलण्याची तयारी सुरू झाली आहे. या दोन्ही स्थानकांना जोडून त्या ठिकाणी भव्य 'इंटिग्रेटेड रेल्वे कॉम्प्लेक्स' विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा पश्चिम रेल्वे प्रशासनाने गुरुवारी केली.

हेही वाचा – Petrol-Diesel Price Today: आज पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या की घटल्या? जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

 2017 पासून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईनंतर, अखेर न्यायालयाच्या परवानगीने ही अतिक्रमण हटाव मोहीम यशस्वी करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी गुरुवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत या महत्त्वाकांक्षी योजनेची माहिती दिली. 

हेही वाचा – Weather Update: राज्यावर दुहेरी अस्मानी संकट! हवामान खात्याने दिला सावधानतेचा इशारा, 'या' तीन जिल्ह्यांमध्ये जारी केला ऑरेंज अलर्ट 

त्याचप्रमाणे, पुढील 15 ते 20 वर्षांतील प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा अंदाज घेऊन सर्व अत्याधुनिक सुविधांचा विस्तार केला जाणार आहे. मोकळ्या झालेल्या जागेचा वापर करून वांद्रे लोकल स्टेशन आणि वांद्रे टर्मिनस परस्परांना जोडले जातील, ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर होईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number