आयुष्मान खुरानाचा आगामी चित्रपट ‘बधाई हो’ लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाच्या टीमने आज मुंबईत सर्वात मोठ्या ‘बेबी शॉवर’चे आयोजन केले होते.

हा कार्यक्रम चित्रपटाच्या प्रचाराचा एक भाग आहे, या चित्रपटात जुने जोडपे पालक बनल्याबद्दल या गर्भवती महिलांचे खेळ आयोजित करण्यात आले होते.

आयुष्मान खुराना, सानिया मल्होत्रा, नीना गुप्ता आणि राजराव तसेच दिग्दर्शक अमित शर्मा यांच्या उपस्थितीत “उफ ओ उफ उफ ओ” हे वित्रिच गाणेही लाँच करण्यात आले.

या कार्यक्रमातील महत्वाची गोष्ट म्हणजे या कार्यक्रमात काही गर्भवती महिलांना बोलवण्यात आले होते.

तसेच या महिलांसाठी एक विशेष फोटो बूथचे आयोजनही करण्यात आले होते.

या महिलांसाठी बक्षिसे आणि विविध खेळांचे आयोजनही करण्यात आले होते, तसेच त्यांना चित्रपटाच्या टीमसोबत संवाद साधण्याची संधीही देण्यात आली, बधाई हा चित्रपट 19 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.