जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
वाहतकू पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी अपक्ष आमदार बच्चू कडूंसह चौघांना सहा महिनेकारावासाची शिक्षा आणि 600 रुपये दंड सुनावण्यात आलीय.
यावेळी अपील करीता मुदत मागण्यात आल्याने त्यांना जामीन मंजूर करण्यात आलाय. 2015मध्ये परतवाडा बस स्थानकासमोर वाहतूक शिपाई इंद्रजीत चौधरींशी वाद घालत शासकीय कामात हस्तक्षेप केला होता.
या प्रकरणी अपक्ष आमदार बच्चू कडूंसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान अचलपूर प्रथम श्रेणी दंडाधिकारी डी.बी पतिंगेंच्या न्यायालयात सुनावणी झालीय.
या सुनावणीत बच्चू कडूंसह चौघांना सहा महिने कारावासासह 600 रुपयांचा दंड ठोठवण्यात आलाय.