जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर
कोल्हापुरात सुरू असलेल्या पुजारी हटाव आंदोलनाला आमदार बचू कडू यांनी पाठिंबा दिला आहे. मंदिरातील पुजाऱ्यांच्या संपत्तीची तपासणी केली तर पश्चिम
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल.
अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली. देवस्थान समितीच्या पैशातून कर्जमाफी करावी आणि सरकारनं यात जातीनं लक्ष घालावे.
शिवाजी महाराजांच्या नावानं सन्मान योजना राबवताना काम मात्र अफजलखानच्या वृत्तीचे सुरू असल्याची थेट टीका बच्चू कडूंनी केली.
शेतकऱ्यांच्या लुटीता परतावा द्या असी मागणी केली तर हमीभावासाठी तीव्र आंदोलन करू असा इशारा बच्चू कडूंनी सरकारला दिला.