बॉलिवूडच्या नावाजलेल्या कुटुंबांपैकी एक म्हणजे कपुर कुटुंब. नुकतीच अभिनेत्री आलिया भट आणि रणबीर कपुर यांना कन्यारत्न झाले. त्यांनतर आता कपुर कुटुंबात पुन्हा एका चिंकल्याचं आगमन झालं आहे. आता अभिनेता अरमान जैन आणि त्याची पत्नी अनीसा मल्होत्रा हे पालक झाले आहेत. २३ एप्रिल रोजी अनीसा मल्होत्रा हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. नुकतंच दोघांनी आपल्या मुलाचे नाव शेअर केले आहे.
कपुर कुटुंबीय नरहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असतात. कपुरांच्या घरातील लाऊन मुलांचे देखील बरेच चाहते आहेत. अलीकडेच अभिनेता रणबीर कपुर आणि अभिनेत्री आलिया भट यांची लेक राहा ही देखील नेटकऱ्यांची आवडती स्टार किड झाली आहे. विशेष म्हणेज हे चिमुकले स्टार किड्स त्यांच्या नावामुळंही चर्चेत असतात .तर आता अरमान जैन आणि अनीसा यांनीही त्यांच्या मुलाचं हटके नाव ठेवलं आहे. त्यांनी आपल्या मुलाचं नाव ‘राणा’ असं ठेवलं आहे. सोशल मीडियावर एक खास पोस्ट करत त्यांनी याबद्दल माहिती दिली.
नव्याने पालक झालेल्या अरमान आणि अनीशा यांच्यावर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर नितु कपुर यांनी खास पोस्ट करत अरमान आणि अनिश चे अभिनंद केले आहे. आपल्या पोस्ट मध्ये त्यांनी लिहिलंय की, ‘आजोबा मनोज आणि आजी रीमा दोघेही बाळाच्या येण्यानं आनंदी आहेत.’ तर अभिनेत्री करिना कपुर खानने लिहिले की, प्राउड पॅरेंट्स. या गोड बातमीने त्यांचे आहेत