म्हणून त्या महिलेची प्रसुती रिक्षेतच झाली

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक नाशिकच्या पंचवटीतील पेठरोडवरील महापालिकेच्या दवाखान्याबाहेर रिक्षात एका महिलेची प्रसूती झाल्याची घटना घडली आहे. महिलेला प्रसूती वेदना सुरू होताच आजुबाजूच्या महिलांनी धाव घेऊन महिलेती प्रसूती सुरक्षितपणे पार पाडली. मात्र, दवाखान्यात आणि प्रसूतीगृहातील कर्मचारी ऑनड्युटी गायब झाल्याने महिलेवर रिक्षात प्रसूत होण्याची वेळ आली. पालिका रुग्णालयाच्या या अनागोंदी कारभारामुळे तेथील नागरिकांनी संताप व्यक्त केला […]

म्हणून त्या महिलेची प्रसुती रिक्षेतच झाली

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

नाशिकच्या पंचवटीतील पेठरोडवरील महापालिकेच्या दवाखान्याबाहेर रिक्षात एका महिलेची प्रसूती झाल्याची घटना घडली आहे. महिलेला प्रसूती वेदना सुरू होताच आजुबाजूच्या महिलांनी धाव घेऊन महिलेती प्रसूती सुरक्षितपणे पार पाडली. मात्र, दवाखान्यात आणि प्रसूतीगृहातील कर्मचारी ऑनड्युटी गायब झाल्याने महिलेवर रिक्षात प्रसूत होण्याची वेळ आली.

पालिका रुग्णालयाच्या या अनागोंदी कारभारामुळे तेथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आजुबाजूच्या महिलांनी धाव घेऊन ही प्रसूती सुरक्षित पार पाडली. पंचवटी परिसरात राहणाऱ्या श्रेया साकेत या महिलेने पालिकेच्या रुग्णालयात प्रसूतीसाठी नाव नोंदवले होते. त्यानुसार महिलेला प्रसूतीवेदना होताच येण्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले होते. सोमवारी महिला रिक्षाने प्रसूतीगृहापर्यंत आली. मात्र, निरोप पाठवूनही कोणीही तिला घेण्यासाठी अथवा स्ट्रेचर घेऊन आले नाही. सुमारे अर्धातास प्रतीक्षा करूनही तेथे कोणी आले नाही. सर्व कर्मचारी बाहेर गेल्याचे सांगण्यात आल्याने अखेर या महिलेची प्रसूती रिक्षातच झाली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number