बाबरी प्रकरणी लालकृष्ण अडवाणींसह 12 जणांना जामिन मंजूर

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली   बाबरीप्रकरणी विशेष सीबीआयच्या न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. यात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यावर आरोप निश्चितीची शक्यता आहे.   सीबीआयच्या विशेष न्यायालयाने तिन्ही नेत्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या महिन्यात 19 एप्रिल रोजी सीबीआयच्या याचिकेवरील सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने अडवाणी, मुरली […]

बाबरी प्रकरणी लालकृष्ण अडवाणींसह 12 जणांना जामिन मंजूर

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

 

बाबरीप्रकरणी विशेष सीबीआयच्या न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. यात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यावर आरोप निश्चितीची शक्यता आहे.

 

सीबीआयच्या विशेष न्यायालयाने तिन्ही नेत्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या महिन्यात 19 एप्रिल रोजी सीबीआयच्या याचिकेवरील सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार आणि साध्वी ऋतंभरा यांच्यावर खटला चालवण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी आज 13 जणांवर आरोप निश्चित होण्याची शक्यता आहे.

काय आहे बाबरी प्रकरण?

अयोध्येत 6 डिसेंबर 1992 रोजी भाजप आणि विश्व हिंदू परिषदेनं कार सेवेचं आयोजन केलं होतं

या कारसेवेत तब्बल 1 लाख 50 हजार कारसेवकांचा समावेश होता

राम मंदिराच्या उभारणीसाठी कारसेवकांनी बाबरी मशिदीला वेढा घातला

लालकृष्ण अडवाणी, उमा भारती आणि मुरली मनोहर जोशींकडे रॅलीचं नेतृत्व होतं

पोलिसांच्या बंदोबस्तानंतरही कारसेवक आणि कार्यकर्त्यांनी बाबरी मशिदीवर चढाई केली

कारसेवक आणि कार्यकर्त्यांनी मशिदीचा घुमट पाडला

या विध्वंसानंतर दिग्गज नेत्यांसह 68 जणांवर ठपका ठेवण्यात आला

बाबरी मशिदीची जागा ही मूळ राम जन्मभूमी असल्याचा कारसेवकांचा दावा आहे

मुघलांनी त्याजागी मशिद उभारल्याचाही कारसेवकांनी दावा केला

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number