‘बात निकलेगी तो दूर तलक जायेगी’; मलिकांचे नवे ट्विट

  राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधत आहेत. मलिकांनी वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आजही मलिकांनी नवे ट्विट करत वानखेडेंवर निशाणा साधला आहे.   नवाब मलिकांनी ट्विट केले की, ‘बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी. लोक बेवजह उदासी का सबब पुछेंगे’, असे ट्विट मलिकांनी केले […]

‘बात निकलेगी तो दूर तलक जायेगी’; मलिकांचे नवे ट्विट

  राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधत आहेत. मलिकांनी वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आजही मलिकांनी नवे ट्विट करत वानखेडेंवर निशाणा साधला आहे.

  नवाब मलिकांनी ट्विट केले की, ‘बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी. लोक बेवजह उदासी का सबब पुछेंगे’, असे ट्विट मलिकांनी केले आहे. हे ट्विट करत मलिक वानखेडेबाबत नवा खुलासा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  नवाब मलिक म्हणाले, ‘माझ्या जावयाच्या घरी गांजा सापडला नाही. तसेच न्यायालयानेही गांजा सापडला नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे फडणवीसांनी माफी मागावी असे मलिक म्हणाले. तसेच माझा अंडरवर्ल्डशी काहीही संबंध नाही. पाच वर्ष मुख्यमंत्री फडणवीसांकडे होते. मग त्यावेळी फडणवीस शांत का बसले, कारवाई का केली नाही असेही ते म्हणाले.

  वानखेडे कुटुंब महागड्या वस्तू वापरत असल्याचे मलिक म्हणाले. समीर वानखेडे सत्तर हजाराचे शर्ट वापरतात तर दोन लाख रुपयांचे बुट वापरतात. त्यामुळे दोन लाख रुपयांचे बूट घालणारी व्यक्ती प्रामाणिक आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच वानखेडे एक लाख रुपयांची पँट वापरतात. वानखेडेंच्या मनगटावर लाखो रुपयांचे घड्याळ असातात. त्यामुळे वानखेडे इतक्या महागड्या वस्तू वापरत असल्याचा आरोप मलिकांनी केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number