राज्यात दंगडी घडवण्यासाठी राम नवमी आणि हनुमान जयंती साजरी केली जात असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. तसेच आव्हाडांनी औरंगाबादेतील दंगलीचा हवाला दिला होता. याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आव्हाडांवर निशाणा साधला आहे.
आव्हाडांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत का?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितीत केला आहे. तसेच, फडणवीस यांनी आव्हाडांना सल्ला दिला आहे. आव्हाडांनी संवदेनशीलतेने बोलावे, असा सल्ला फडणवीसांनी आव्हाडांना दिला आहे. महाराष्ट्रात दंगली होतील, असं वक्तव्य आव्हाडांनी करणं चुकीचं आहे. हा समाजाचा आणि रामभक्ताचा अपमान असल्याचंही फडणवीस म्हणाले.
‘जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं विधान आक्षेपार्ह आहे. लोकांमध्ये रामाविषयी आणि हनुमानाविषयी श्रद्धा आहे. दंगलीकरीता रामनवमी किंवा हनुमान जयंती साजरी केली जाते, असे म्हणणं म्हणजे भक्तांचा अपमान असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच, राज्यातील नेत्यांनी राज्यात दंगली होतील असं वक्तव्य करणं चुकीचं आहे, अशा प्रकरणात काळजीपूर्वक बोललं आणि वागलं पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हनुमान जयंती आणि रामनवमी साजरी करण्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. औरंगाबाद येथे उसळलेल्या दंगलीचा हवाला देत राज्यात दंगडी घडवण्यासाठी राम नवमी आणि हनुमान जयंती साजरी केली जात असल्याचं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं.