पावसाळ्यात ‘हे’ पदार्थ खाणे टाळा

मुंबई, २३ जून २०२३, प्रतिनिधी : राज्यात आजपासून पावसाचे आगमन झाले. त्यामुळे अखेर उन्हाने त्रस्त झालेल्या मुंबईकरांनी अखेर सुटकेचा श्वास सोडला. परंतु पावसाळा म्हटलं की आजारांना आमंत्रण सहज मिळतं. यासाठी आपण काय खातो याची काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे.तर पावसाळ्यात काय काय खान टाळावं हे पाहूया : सीफूड : पावसाळ्यात सीफूडपासून दूर राहा कारण […]

पावसाळ्यात ‘हे’ पदार्थ खाणे टाळा

मुंबई, २३ जून २०२३, प्रतिनिधी : राज्यात आजपासून पावसाचे आगमन झाले. त्यामुळे अखेर उन्हाने त्रस्त झालेल्या मुंबईकरांनी अखेर सुटकेचा श्वास सोडला. परंतु पावसाळा म्हटलं की आजारांना आमंत्रण सहज मिळतं. यासाठी आपण काय खातो याची काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे.तर पावसाळ्यात काय काय खान टाळावं हे पाहूया :

सीफूड : पावसाळ्यात सीफूडपासून दूर राहा कारण ते तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. पावसाळ्यात माशांचा प्रजनन काळ सुरु होतो. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेले मासे अनेकदा ताजे नसतात. त्यामुळे ते खाणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.

पालेभाज्या : कोबी किंवा पालक हिरव्या पालेभाज्या पावसाळ्यात खाऊ नयेत. कारण त्यात किटक आणि सूक्ष्मजीव आढळतात. त्यामुळे संसर्गाचा धोका अनेक पटींनी वाढतो.

तळलेले पदार्थ खाणे टाळा : या हंगामात तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाण्याने पोटाचा त्रास होऊ शकतो. यामुळे तुम्हाला अपचन आणि डायरियाच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number