पार्श्वगायकाच्या भूमिकेत आता प्रसनजीत, दिल्या शब्दाला जागला अवधूत गुप्ते

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई ‘सूर नवा ध्यास नवा’ या रिअॅलिटी शोमधून प्रसनजीत कोसंबी हे नाव प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. या कार्यक्रमामुळे नावारूपास आलेला प्रसनजीत कोसंबी लवकरच ‘वाघेऱ्या’ या आगामी सिनेमाद्वारे पार्श्वगायकाच्या भूमिकेतून लोकांसमोर येत आहे. रिअॅलिटी शोच्या मंचावरील प्रसनजीतच्या बहारदार गाण्यावर खुश होऊन, परीक्षक अवधुत गुप्तेने ‘माझ्या पुढील चित्रपटात तू पार्श्वगायक म्हणून झळकशील!’ असे त्याला वचन दिले होते, आणि […]

पार्श्वगायकाच्या भूमिकेत आता प्रसनजीत, दिल्या शब्दाला जागला अवधूत गुप्ते

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

‘सूर नवा ध्यास नवा’ या रिअॅलिटी शोमधून प्रसनजीत कोसंबी हे नाव प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. या कार्यक्रमामुळे नावारूपास आलेला प्रसनजीत कोसंबी लवकरच ‘वाघेऱ्या’ या आगामी सिनेमाद्वारे पार्श्वगायकाच्या भूमिकेतून लोकांसमोर येत आहे.

रिअॅलिटी शोच्या मंचावरील प्रसनजीतच्या बहारदार गाण्यावर खुश होऊन, परीक्षक अवधुत गुप्तेने ‘माझ्या पुढील चित्रपटात तू पार्श्वगायक म्हणून झळकशील!’ असे त्याला वचन दिले होते, आणि हेच वचन पूर्ण करत अवधुतने येत्या १८ मे रोजी प्रदर्शित होत असलेल्या ‘वाघेऱ्या’ सिनेमाचे, प्रमोशनल सॉंग प्रसनजीतकडून गाऊन घेतले. आजीवासन स्टुडियोमध्ये नुकतेच हे गाणे प्रसनजीतच्या आवाजात रेकाॅर्ड करण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number