सिक्कीममध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू

सिक्कीममधील नथूला सीमावर्ती भागात मंगळवारी हिमस्खलन झाले. या हिमस्खलनात 7 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर, 11 जण जखमी झाले आहेत. भारतीय लष्कराने आणि मदत-बचाव पथकाने 22 जणांची सुटका केली आहे. या हिमस्खलनात अद्याप ८० पर्यटक अडकल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये चार पुरुष, एक महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. मृतांची […]

सिक्कीममध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू

सिक्कीममधील नथूला सीमावर्ती भागात मंगळवारी हिमस्खलन झाले. या हिमस्खलनात 7 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर, 11 जण जखमी झाले आहेत. भारतीय लष्कराने आणि मदत-बचाव पथकाने 22 जणांची सुटका केली आहे. या हिमस्खलनात अद्याप ८० पर्यटक अडकल्याची माहिती समोर आली आहे.

भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये चार पुरुष, एक महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या हिमस्खलनानंतर गंगटोकला नथूला याला जोडणाऱ्या जवाहरलाल नेहरू मार्गावर बचावकार्य सुरू आहे. रस्त्यावरून बर्फ हटवल्यानंतर जवळपास 350 पर्यटक आणि 80 वाहनांची सुटका करण्यात आली. दरम्यान, परवानगी नसताना पर्यटक तेथे गेल्याची माहिती मिळाली आहे.

हिमस्खलनात अडकलेल्या 22 जणांची सुटका करण्यात आली असून त्यांना गंगटोक येथील एसटीएनएम रुग्णालय आणि सेंट्रल रेफरल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number