रिक्षा-टॅक्सीविरोधातील तक्रारींसाठी, परिवहन विभागातर्फे हेल्पलाइन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई ऑटोरिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या विरोधात असंख्य तक्रारी असतात. त्यांची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यासाठी परिवहन विभागातर्फे हेल्पलाइन क्रमांक व टोल फ्री सुविधा देण्यात आली आहे. याअंतर्गत मुजोर चालकांविरोधात प्रवाशांना तक्रार करता यावी म्हणून, 1800220110 या टोल फ्री क्रमांकाचा स्टिकर प्रत्येक रिक्षा, टॅक्सीत चिकटवणे बंधनकारक करण्यात येईल. तसेच याबाबतचे फलक ठिकठिकाणी लावण्यात येतील, अशी […]

रिक्षा-टॅक्सीविरोधातील तक्रारींसाठी, परिवहन विभागातर्फे हेल्पलाइन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

ऑटोरिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या विरोधात असंख्य तक्रारी असतात. त्यांची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यासाठी परिवहन विभागातर्फे हेल्पलाइन क्रमांक व टोल फ्री सुविधा देण्यात आली आहे.

याअंतर्गत मुजोर चालकांविरोधात प्रवाशांना तक्रार करता यावी म्हणून, 1800220110 या टोल फ्री क्रमांकाचा स्टिकर प्रत्येक रिक्षा, टॅक्सीत चिकटवणे बंधनकारक करण्यात येईल. तसेच याबाबतचे फलक ठिकठिकाणी लावण्यात येतील, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. 

‘सध्या राज्यात चार लाख बेकायदेशीर रिक्षा असून, त्या नियमित करण्यासाठी सरकारने मार्चअखेरपर्यंत मुदत दिली आहे. आवश्यकता पडल्यास ती मुदत अजून वाढविण्यात येर्इल’, असे आश्वासनही रावते यांनी दिले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number