Auto Fair Hike : आता शहरांतर्गत प्रवासही महागणार? रिक्षा भाडेवाढीची टांगती तलवार, सर्वसामान्य धास्तावले

एलपीजी गॅसवरील रिक्षाचे भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. 

Auto Fair Hike : आता शहरांतर्गत प्रवासही महागणार? रिक्षा भाडेवाढीची टांगती तलवार, सर्वसामान्य धास्तावले

इराण-अमेरिका युद्धाचा परिणाम आता जगावर दिसून येत आहे. भारतात आता याचे पडसाद उमटताना बघायला मिळत आहेत. घरगुती गॅसमध्ये दरवाढ झाली आहे. अशातच आता आता एलपीजी गॅस दरवाढीने ऑटो रिक्षाचालकही अडचणीत आले आहेत. त्यामुळे एलपीजी गॅसवरील रिक्षाचे भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. 

आखाती देशातील युद्धाचा ऑटो एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. दरवाढीमुळे रिक्षाचालक अडचणीत आले आहेत. भाडेवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने ऑटो एलपीजी गॅस दरवाढीवर तोडगा काढावा अशी मागणी रिक्षा चालक आणि संघटनांनी केली आहे. असे न झाल्यास प्रवासही महाग होऊ शकतो. त्यामुळे आता यावर कोणता तोडगा निघतो हे पाहण्यासारखे आहे. 

हेही वाचा – Iran Israel US War: 'मोदींचा एक फोनही युद्ध थांबवू शकतो'; यूएईच्या राजदूतांचे मोठे विधान, इराण-इस्रायल वादात भारताची भूमिका कळीची? 

 जर गॅस संपला आणि नवीन पुरवठा आला नाही, तर घरांमध्ये स्वयंपाकाच्या गॅसचे संकट अधिकच वाढेल, ज्यामुळे लोकांना जगण्यासाठी आवश्यक असलेले अन्न शिजवणे कठीण होईल. दरम्यान गॅस दरवाढीचा परिणाम हॉटेल व्यावसायिकांवरदेखील होताना दिसून येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, तेल कंपन्यांकडे फक्त दोन दिवसांचा गॅस शिल्लक आहे. परिस्थिती अशी झाली आहे की बहुतेक एजन्सींकडे फक्त दोन दिवसांचा गॅस शिल्लक आहे. परिस्थिती पाहता, आजपासून मुंबई आणि बेंगळुरूमधील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंद राहतील.

हेही वाचा – Mumbai Hotel Closed News : मोठी बातमी! आखाती युद्धाचा मोठा परिणाम; मुंबईतील हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर, घरातही अन्न शिजवणं होणार कठीण 

या समस्येबाबत आहार संघटना केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांशी संवाद साधत आहे. तसेच राज्यातील अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची मंगळवारी संघटनेचे प्रतिनिधी भेट घेणार असून गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली जाणार आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number