जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण
कल्याणमध्ये रिक्षा रस्त्यावर बेशिस्तपणे उभी करणाऱ्या रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई करणारे वाहतूक पोलिस नामदेव हिमगिरे यांना दोन रिक्षा चालकांनी मारहाण केली.
मारहाण करणा-या रिक्षा चालकांची नावे राहूल कारंडे व बाळा ठाकूर अशी आहेत. पोलिसांनी रिक्षा चालक कारंडे याला अटक केली. या प्रकारामुळे रिक्षा चालकांची मुजोरी व बेशिस्तपणा पुन्हा एकदा समोर आला.
या प्रकरणी पोलिसांनी कारंडे याला अटक केली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार कोणी तरी मोबाईलमध्ये कैद करुन त्याची क्लीप वायरल केली.
या क्लीपमध्ये पोलिसही रिक्षा चालकाच्या अंगावर धावून जात असल्याचे दिसून येत आहे असा आरोप रिक्षा चालकांकडून करण्यात येत आहे.