जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
आयुर्वेदाचा वापर सर्व गोष्टींसाठी होतो, असे सांगणारे जेष्ठ आयुर्वेदतज्ञ परशुराम य़शवंत खडीवाले ऊर्फ वैद्य खडीवाले यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी निधन झाले. वयाच्या वर्षी त्यांचे निधन झाले. खडीवाले हे भारतीय हवाई दलातून सुमारे सतरा वर्षे नोकरी करून एप्रिल 1968 मध्ये निवृत्त झाले होते. त्यांचे वडील यशवंत हरी वैद्य यांचा औषध निर्माणाचा मोठा व्यापार होता. त्याकडे पाहायला कोणी नव्हते. प.य. खडीवाले यांनी हवाई दलातून निवृत्त झाल्यावर पुण्यात येऊन सोळा हजार चौरस फुटांची जागा घेतली व हरी परशुराम औषधालय सुरू केले.
आयुर्वेदाच्या 300हून अधिक औषधांचे महत्त्व त्यांनी जगाला समजावून सांगितले. त्याशिवाय, त्याबाबतच्या श्लोकांचे पाठांतरही ते करायला लावत. अनेक वर्षांपासून त्यांनी हे काम विनामोबदला केले. त्यांचे ‘आयुर्वेद सर्वांकरीता’ हे पुस्तक खूप गाजले. याशिवाय, ‘आयुर्वेदीय उपचार’, ‘आयुर्वेदीय वनौषधी’, ‘ए टू झेड आरोग्यवर्धिनी’, “औषधाविना उपचार’, ‘कानाचे विकार’, ‘निरामय सौंदर्य आणि आयुर्वेद’, ‘पूर्णब्रह्म’, ‘सहज सोपे घरगुती आयुर्वेदीय उपचार’ अशी त्यांची विविध पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांच्या पार्थिवावर सांयंकाळी पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.