जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद
औरंगाबादमध्ये चालत्या रिक्षात महिलेची प्रसुती झाली आहे. औरंगाबादच्या जांबरखेडा परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.
खड्ड्यामुळे महिलेला रिक्षातच प्रसुतीकळा सुरु आल्या अन् या महिलेने रिक्षातच बाळाला जन्म दिला.
मात्र, वेळेवर उपचार न मिळाल्यानं अर्भक दगावलं आहे.
आठवड्याभरात खड्ड्यांमुळे शहरात तिघांचा मृत्यू झाला आहे.