जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद
औरंगाबादमध्ये मुख्याध्यापकानेच विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली आहे. शिक्षकाने केलेली मारहाण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
ही दृश्यं आहेत सिल्लोडच्या वरुड काझीतल्या जे शहा या इंग्रजी शाळेतील. मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून पालक आपल्या मुलांना पैसे भरून नामांकित शाळेत पाठवतात.
मात्र, शाळेत या विद्यार्थ्यांना एखाद्या गुन्हेगारासारखी मारहाण होत आहे. त्यामुळे या मारकुट्या मुख्याध्यापकावर आता काय कारवाई होते याकडे लक्ष लागले.