'औरंगजेब हिंदूद्वेष्टा नव्हता' असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. याआधी देखील अनेकदा राष्ट्रवादीकडून औरंगजेबाचे समर्थन करण्यात आले होते. जितेंद्र आव्हाडांच्या या ताज्या वक्तव्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. नागपूर येथे नुकतेच राज्याचे हिवाळी अधिवेशन पार पडले. या अधिवेशनामध्ये विरोधीपक्ष नेते […]
'औरंगजेब हिंदूद्वेष्टा नव्हता' असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. याआधी देखील अनेकदा राष्ट्रवादीकडून औरंगजेबाचे समर्थन करण्यात आले होते. जितेंद्र आव्हाडांच्या या ताज्या वक्तव्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे.
नागपूर येथे नुकतेच राज्याचे हिवाळी अधिवेशन पार पडले. या अधिवेशनामध्ये विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानावरून सध्या राज्यात राष्ट्रवादी विरोधात आंदोलने सुरू आहेत. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते असं विधान अजित पवार यांनी केले होते. आपल्या या विधानाबाबत अजित पवार यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे. त्यांची पाठराखण करण्यासाठी पुढे सरसावलेल्या राष्टवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आता त्यात भर घालत आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांना आम्ही पहिल्यापासून स्वराजरक्षकच म्हणतो. ते संगमेश्वरला सरदेसाई वाड्यात होते, ही माहिती औरंगजेबाला कोणी दिली ? इथेच तर खरा इतिहास लपल्याचे आव्हाडांचे म्हणणे आहे. छत्रपती संभाजी महाराजांना बहादूर येथे नेण्यात आले होते तेथे त्यांचे डोळे काढण्यात आले होते. त्या ठिकाणी विष्णूचे मंदिर होते, जर औरंगजेब हिंदूद्वेष्टा असता तर ते विष्णूचे हे मंदिरही तोडले असते, आणि पुढे काय झालं तो इतिहास सर्वांना माहितीच आहे, असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटले आहे.
अशा वादग्रस्त विधानानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यावर स्पष्टीकरण देत. औरंगजेब किती क्रूर होता हे इतिहासात आधीच लिहून ठेवण्यात आले आहे. त्याने त्याच्या भावाला आणि वडिलांना देखील मारलं आणि स्वतः गादीवर बसला. औरंगजेब क्रूरच होता. स्वत:च्या राज्य रचनेकरता औरंगजेब कोणालाही सोडत नव्हता, पण त्याला महाराष्ट्र शेवट प्रयन्त जिंकता आला नाही असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे.